Union Minister Ramdas Athawale addressing the RPI State-Level Camp in Mahabaleshwar while speaking on the Maratha reservation issue. Saam Tv
Video

Ramdas Athawale On Maratha Aarakshan: मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे; पण रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ramdas Athawale Statement On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; पण ओबीसींवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाबळेश्वर येथील आरपीआय विचारमंथन शिबिरात स्पष्ट केले.

Omkar Sonawane

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही रामदास आठवले यांची स्पष्ट भूमिका

सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नसल्याचे विधान

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घ्यावी, असा सल्ला

ओबीसींवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याचा ठराव महाबळेश्वर शिबिरात मंजूर

आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. या शिबिरात पक्ष वाढीच्या अनुषंगाने मंत्री आठवले यांनी राज्यातून आलेल्या आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. याबरोबरच महायुती मधून या पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आरपीआय पक्षाला महामंडळ आणि मंत्रिपदे मिळतील असा ठराव घेण्यात आला.

दरम्यान यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाबाबत मनोज जरागेंचा आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाल्या असल्याचे सांगत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे. एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनोज जारंगे यांनी घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी असा सल्ला त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrawar Upay: शुक्रवारी 'हे' उपाय केल्याने होईल लक्ष्मी देवी प्रसन्न; आर्थिक समस्या होतील दूर

Todays Horoscope: 'या' राशींना आज जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल, पाहा राशीभविष्य

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT