Ram Satpute open challenge Ranjitsinh Mohite Patil : भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना ओपन चॅलेंज दिलेय. यापुढे कोणत्याही निवडणुका लागू द्या, हिसका दाखवतो, असे थेट चॅलेंज सातपुते यांनी मोहिते पाटलांना दिलेय. माळशिरसमध्ये ते बोलत होते. यावेळी सातपुतेंनी मोहिते पाटलांवर आरोप केला. माळशिरस येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका केली.
मी लढणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या कामासाठी मी या तालुक्याला पाय रोवून भक्कमपणे उभा आहे. एक रिंग वाजयाच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा फोन उचलतात. यापुढे कोणती ही निवडणूक लागू द्या. आता तुम्ही मैदानात या हिसका दाखवतो, असे आव्हान सातपुते यांनी मोहिते पाटील यांना दिले आहे.
भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते यांच्यावर घणाघती टीका केली. माळशिरस तालुक्यातील सहकारी संस्था मोहिते पाटलांनी मोडून काढल्या आणि आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सहकार वाचला पाहिजे असं तत्त्वज्ञान सांगत आहेत, अशा शब्दात सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टिका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.