Salman Khan Watch saam tv
Video

Salman Khan: बजरंगी भाईजानच्या हातात रामाचं घड्याळ, सलामान खानच्या खास घड्याळची किंमत ऐकून व्हाल थक्क

Salman Khan Watch: सलमान खानने ईदसाठी प्रदर्शित होणाऱ्या 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ३४ लाख रुपयांचे जेकब अँड कंपनी एपिक एक्स राम जन्मभूमी रोझ गोल्ड घड्याळ घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Dhanshri Shintre

सलमान खान सध्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे जो रमजान ईदला प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात तो स्टायलिश पोशाखात दिसला. परंतु त्याचे जेकब अँड कंपनी एपिक एक्स राम जन्मभूमी रोझ गोल्ड एडिशन घड्याळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्याच्या हातावर भगवान रामाची झलक दिसल्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सलमान खानच्या नवीन फॅशनमुळे त्याचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या घड्याळाच्या डायलवर भगवान राम, हनुमान आणि अनेक हिंदू देवतांचे चित्र आहेत, आणि "जय श्री राम" असे सुंदर शब्द लिहिलेले आहेत, त्यामुळे ते अत्यंत आकर्षक दिसते. सलमानच्या पोस्टवर चाहत्यांकडून भरपूर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टाईम्स ऑफ इंडियानुसार, घड्याळाचा टायटॅनियम एडिशन २ ची किंमत ३४ लाख रुपये आहे. तर काही रिपोर्टनुसार घड्याळाची किंमत ६१ लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी, अभिषेक बच्चन इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) सीझन २ च्या लाँचिंगमध्ये उपस्थित असताना, त्याच्या मनगटावर देखील हेच महागडं घड्याळ दिसले होते. या घड्याळाची लक्झरी आणि आकर्षक डिझाइन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानने इन्स्टाग्रामवर त्याच्या घड्याळाचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, '३० मार्च रोजी थिएटरमध्ये भेटू'. त्याच्या पोस्टवर चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT