Raju Shetty Saam Tv
Video

Raju Shetty: आमचं कर्ज कधी माफ होणार? पायतान काढून विचाराचं, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Raju Shetty On Maharashtra Government: राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका केली. 'आमचं कर्ज कधी माफ होणार? पायतान काढून विचाराचं.', असं म्हणत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Priya More

राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं गेलं. संपूर्ण पिक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करू. मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचं आवाहन केलं आहे. राजू शेट्टी यांनी'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत देवेंद्र फडणवीस यांची क्लिप सभेत वाजवून दाखवली.

मुख्यमंत्री आता ६ तारखेला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी कारंजा इथं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. 'आता शेतकऱ्यांनी त्यांच्या पायातील पायातान काढून त्यांना विचारलं पाहिजे की आमचं कर्ज कधी माफ होणार?', असं मोठं विधान राजू शेट्टी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

ठाणेकरांवर पाणीसंकट, 24 तास 10 टक्के पाणीकपात यातला तुमचा एरिया कोणता? वाचा

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

SCROLL FOR NEXT