Rajashree Umbre Maratha Reservation SaamTv
Video

Rajashree Umbare : ''..तर मी देहत्याग करेन''; राजश्री उंबरेंनी दिला थेट इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी १० दिवस होता.

Saam Tv

''येणाऱ्या 17 सप्टेंबरपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी देहत्याग करेन'' असा इशारा राजश्री उंबरे यांनी दिल आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी १० दिवस होता. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे, या व इतर २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे पाटील यांनी २ तारखेपासून क्रांतीचौक येथे उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी १० दिवस होता. यावेळी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून पाणी देत उपोषण सोडण्याचे विनंती केली. यावेळी 'लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेऊ, तसेच चर्चा करून मार्ग काढण्यात येईल', असे म्हणत शिष्टमंडळाने मुंबईमध्ये बैठकीसाठी येण्याचे आवाहन सावे यांनी केलं. मात्र ''येणाऱ्या 17 सप्टेंबरपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी देहत्याग करेन'', असा थेट इशारा राजश्री उंबरे यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT