Sitare Zameen Par saam tv
Video

राज ठाकरे आणि सचिन तेंडूलकर आमिर खानच्या भेटीला, कारण काय? VIDEO

Surprise Entry: तारे जमीन पर’ या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Omkar Sonawane

तारे जमीन पर’ या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने अभिनेता आणि निर्माता आमिर खान यांनी त्यांच्या निवासस्थानी एका खास म्युझिकल नाईटचं आयोजन केलं होतं. ही संगीतमय रात्र प्रेक्षकांसाठी आणि उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरली.

या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या सरप्राइझ एंट्रीने. सचिन यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर हाही कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या खास उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेलं.

या म्युझिकल नाईटमध्ये ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातील दहा नवोदित बालकलाकारांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहभाग घेतला. या चिमुकल्यांनी सादर केलेल्या परफॉर्मन्समुळे उपस्थितांची मनं जिंकली.

चित्रपट आणि कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावणारा ठरणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT