Raj Thackeray meet CM Devendra Fadnavis  
Video

राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Raj Thackeray meet CM Devendra Fadnavis : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा पराभव. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray meet CM Devendra Fadnavis बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत बुधवारी ठाकरे बंधूंना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याच माहिती मिळाली आहे. राज ठाकरेंनी फडणवीस यांची भेट का घेतली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, पण यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुढील काही दिवसांत बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. त्याचीच लिटमस चाचणी म्हणून बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र उतरले होते. पण त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Side Effects: जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने फायद्याऐवजी होतं नुकसान? पण कसं?

MSRTC News: ‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

GK : भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे? जाणून घ्या

Shocking : एकाच तरुणीला दोघांनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार, शिक्षकाच्या काळ्या कृत्यामुळे परभणी हादरली

SCROLL FOR NEXT