Minister Sanjay Shirsat reacts after Raj Thackeray presents proofs against Election Commission during Satyacha Morcha in Mumbai. Saam Tv
Video

सत्याचा मोर्चा निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घ्यावा, राज ठाकरेंनी पुरावे दाखवल्यानंतर राज्याच्या मंत्र्यांचं विधान|VIDEO

Satyacha Morcha: मुंबईत विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा पार पडला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत पुरावे सादर केले. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत, निवडणूक आयोगाने हे गांभीर्यानं घ्यावं असं म्हटलं.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा पार पडला. या दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मोठे पुरावे सादर केले. यावरच महायुतीचे मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, आम्ही पहिल्यांदा क्लिअर केल आहे. हा विषय आमचा नाही, सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही.

ते पुरावे दाखल करत असतील तर निवडणूक आयोगाने गांभीर्याने यावर विचार करायला पाहिजे. दुबार मतदार असतील तर हा वादाचा विषय होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने त्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. निवडणूक लांबवायची का घ्यायची हा निर्णय सुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे. जर लोकांचा आक्रोश असेल लोकांना वाटत असेल तर त्याची छाननी करायला काही हरकत नसावी. मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा पूर्वीही नव्हता आणि आजही नाही असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mexico Supermarket : सुपरमार्केटमध्ये अग्नितांडव! लहान मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Onion For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी कांदा ठरेल बेस्ट, रक्तातली साखर होईल झटक्यात कमी, तज्ज्ञांनी दिली माहिती

KBC 17: 'मी हरलो नाहीये, माझे पैसे द्या...'; अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये हॉट सीटवरून उठण्यास प्रसिद्ध गायकाचा नकार

Maharashtra Tourism: शिमला-मनाली विसराच! हिरवागार निसर्ग अन्...मुंबईपासून अगदी काहीच अंतरावर आहेत 'हे' हिल स्टेशन, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT