Raigad saam TV
Video

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

Fishing Ban Violation In Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 38 मच्छिमारांवर कारवाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३८ मच्छिमारांवर कारवाई करण्यात आली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असते. मात्र, ही बंदी झुगारून काही मच्छिमार मासेमारी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने ही कारवाई केली.

या कारवाईत ८ बोटी जप्त करण्यात आल्या असून संबंधित मच्छिमारांकडून एकूण २९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. खोल समुद्रातील माशांच्या प्रजातींना पुनरुत्पादनासाठी वेळ मिळावा यासाठी ही मासेमारी बंदी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बंदी काळात मासेमारी करताना आढळून आल्यास आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain shrinking: कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

मध्यरात्री हायवेवर थरार! १८ ते २० हल्लेखोरांचा बसवर अंदाधुंद गोळीबार; १८ प्रवाशांचं अपहरण, सिंध हादरलं

Accident: भीषण अपघात! ११ वाहनं धडाधड धडकली, नंतर पेटली; १३ प्रवासी जिवंत होरपळले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

Methi Usal Recipe: झणझणीत मेथी उसळ कशी बनवायची? वाचा गावरान रेसिपी

SCROLL FOR NEXT