Rahuri pot nivadnuk akshay kardile vs Govind Mokate saam tv
Video

Rahuri Election : राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! भाजप-शरद पवार गटात मुख्य लढत, हे ७ उमेदवार रिंगणात, VIDEO

Rahuri by Election : महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या राहुरी पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता सात उमेदवार असणार आहेत. राहुरीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मुख्य लढत होणार आहे.

Nandkumar Joshi

सचिन बनसोडे, राहुरी | साम टीव्ही

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. ७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात मुख्य लढत होईल. या दोन पक्षांव्यतिरिक्त आणखी पाच उमेदवार ही निवडणूक लढत आहेत.

राहुरीची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. पण राजकीय घडामोडी घडल्या आणि ही निवडणूक चुरशीची होईल हे स्पष्ट झाले आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. २३ जणांनी माघार घेतली. तर प्रमुख पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून अक्षय शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय संतोष एकनाथ चोळके हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही रिंगणात आहेत. रावसाहेब सदाराम खेवरे, महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे हे इतर अपक्ष उमेदवारही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्गावरील वेरळ येथे पुन्हा दरड कोसळली

Ghavachi Kheer Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी गोड खायची इच्छा होते? घरी झटपट बनवा टेस्टी गव्हाची खीर, वाचा रेसिपी

वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

School Holiday: कोणकोणती शहरं आणि जिल्ह्यात आज शाळा- कॉलेजला सुट्टी, जाणून घ्या एका क्लिकवर...

'गर्व से कहो हम हिंदू है...'; उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?

SCROLL FOR NEXT