Rahul Gandhi saam tv
Video

Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग कार्यक्रम पुढे ढकलला; राहुल गांधींची घोषणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील कार्यक्रम पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली होणार असून नागरिकांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग कार्यक्रमाबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केलीये. पावसामुळे शुक्रवारी होणारा सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता हा कार्यक्रम शनिवारी त्याच वेळी आयोजित केला जाणार आहे. पावसामुळे ज्येष्ठ नेत्यांना बसण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकमताने हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.

शुक्रवारी राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील इतर नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाभियोगासंदर्भातील कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधकांची भव्य महारॅली होणार आहे.

या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संघटना, नागरी संस्था, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: उत्तराखंडच्या चमोलीत हेलिकॉप्टरचा अपघात; ५ प्रवासी असल्याची शक्यता

MSRTC Card: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपूर्वी हे काम करा, नाहीतर सवलत बंद होणार?

Veen Doghantli Hi Tutena: स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात येणार चिमुकला पाहुणा? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मोठा ट्विस्ट

Helicopter Crash : मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता; ५ प्रवासी असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT