Radhakrishna Vikhe Patil 
Video

..तर हे भोग मराठा समाजाच्या पदरी आले नसते; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्तर

Maratha Reservation Row: मराठा आरक्षणावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे समर्थन केले. मविआ सरकारवर टीका करत मराठा समाजासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Namdeo Kumbhar

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत वेळोवेळी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. याच वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत, तत्कालीन मविआ सरकारच्या काळात मराठा आरक्षणाबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय रद्द झाले, त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. जर त्यावेळी योग्य निर्णय झाले असते, तर आज हे भोग मराठा समाजाच्या पदरी आले नसते, असा हल्लाबोल त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजासाठी पुन्हा मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी आतापर्यंत केलेल्या सर्व कार्यवाहीचा आणि अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल मनोज जरांगे पाटील यांना पाठवला जाईल. या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्याही दूर केल्या जातील, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

Maharashtra News Live Update: पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचपूर बंधारा बुडाला पाण्याखाली, महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटला

Shocking : पोटच्या मुलाचे विकृत कृत्य, आईवर केले लैंगिक अत्याचार; हात बांधले अन्...

BJP: भाजपला मोठा झटका! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT