Video

Sindhudurg : बांधकामाच्या निविदेवरून जिल्हा परिषदेत राडा; शिवसेनेचा नेत्याच्या अन् ठेकेदाराच्या अंगरक्षकांमध्ये हाणामारी

Sindhudurg : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उबाठा शिवसेनेच्या नेत्यासह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली.

Bharat Jadhav

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

सावंतवाडी येथील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे कोट्यवधी रुपयांची होती. ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज (सोमवार) होती. ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते. हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम विचारून त्यांच्या जवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते.

दरम्यान ही घटना ओरोस येथे असलेल्या उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांना समजली. त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उबाठा शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना उसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT