Pune Toxic Liquor Case Sakal
Video

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, विषारी दारूमुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात खळबळ

Pune Toxic Liquor Case : पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि हडपसर परिसरात विषारी दारूमुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अवैध दारू रॅकेटचा सखोल तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Pune Toxic Liquor Case Latest News : पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि हडपसर परिसरात विषारी दारूमुळे तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांत विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्याच्या हडपसर परिसरात ६ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. यामुळे या दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. याशिवाय, विषारी दारूची बाधा झालेल्या काही रुग्णांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भीषण घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. विषारी दारू विक्री प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा कसून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT