viral video showing the man assaulting the woman on Pune-Satara Road during Navratri celebrations. saam tv
Video

Shocking: आधी लाथाबुक्यांनी मारहाण, नंतर ताई म्हणाला; विचित्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime : नवरात्रोत्सवादरम्यान पुणे-सातारा रोडवर एका तरुणाने एका मुलीला क्रूरपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

Bharat Jadhav

  • पुण्यातील सातारा रस्त्यावर एका तरुणीवर तरुणानं केलेली मारहाण सोशल मीडियावर व्हायरल झाली.

  • ही घटना नवरात्र उत्सवाच्या काळात घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • मारहाण करणाऱ्याला तरुणाला अटक

नवरात्र उत्सव काळात पुण्यात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. १ ऑक्टोबर रोजी पुणे सातारा रस्त्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका किरकोळ कारणातून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती.

अखेर सहकारनगर पोलिसांनी या तरुणाला शोधून काढले मात्र त्याच्या विरोधात संबंधित तरुणीने तक्रार न दिल्याने त्यावर कारवाई झाली नाही. मात्र असे असतानाच या तरुणाने त्याची चूक कबूल केली आणि "माझ्याकडून चूक झाली, मी "ताई" आणि तिच्या घरच्यांची माफी मागतो" अशी दिलगिरी व्यक्त केली.

घटनेचा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?

तरुणीला हाणामारीचा हा व्हिडिओ पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर जाणाऱ्या मार्गावरील आहे. ज्यावेळी ही घटना घडली होती, त्यावेळी हा तरुण कोण होता आणि त्या तरुणीसोबत त्याचे नाते काय याबाबत कोणतीच माहिती मिळाली नव्हती. परंतु आता पोलिसांनी मारहाण करणाऱ्याला तरुणाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram Award Function: इन्स्टाग्राम युजर्सला खुशखबर! टॉप क्रिएटर्सना मिळणार स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

Pandharpur : अखेर निराधार वृध्द महिलेला मिळालं हक्काचं घर; घर उभारण्यासाठी नृत्यांगना सायली पाटील यांच्या पुढाकार

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

बापाने पोटच्या २ चिमुकल्यांचा घेतला जीव, नंतर स्वत:ही आयुष्य संपवलं; धक्क्दायक कारण समोर

Diwali Ubtan Recipe : दिवाळीला घरीच बनवा सुगंधी उटणे, टॅनिंग होईल दूर अन् चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

SCROLL FOR NEXT