Sachin Ghaywal Macoca saam tv
Video

पुणे पोलिसांचा दणका! निलेश घायवळनंतर सख्खा भाऊ सचिनवरही मकोका, VIDEO

Pune Police : पुण्यातील घायवळ बंधूंवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं असतानाच, पुणे पोलिसांनी घायवळ बंधूंना मोठा दणका दिला आहे. निलेश घायवळनंतर आता त्याचा भाऊ सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

Akshay Badve

गुंड निलेश घायवळ आणि त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सचिनवर कारवाई केली आहे. या प्रकरणात सचिन घायवळ याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप सुरू आहेत. तर या आरोपांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तर दिलं जात आहे. त्याचवेळी पुणे पोलिसांनी याच घायवळ बंधूंना जोरदार धक्का दिला आहे. सचिन घायवळ याच्यावर मकोका लावला आहे. कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात सचिन घायवळवर गुन्हा नोंदवला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात निलेश घायवळ, सचिन घायवळ याच्यासह इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात एका व्यक्तीवर घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. घायवळ टोळीचा भाग असल्याने आता सचिन घायवळवर मकोका लावला आहे.

दरम्यान, निलेश घायवळ प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. घायवळ यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT