Police aspirants outside Sahakarnagar Police Station after filing a complaint against the goons who attacked them during practice at Taljai Hills, Pune.  Saam Tv
Video

Pune News: पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांवर गावगुंडांचा हल्ला|VIDEO

Sexual Harassment And Physical Assault On Police Aspirants: पुणे येथील तुळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणांवर गावगुंडांनी हल्ला केला. अश्लील टिप्पण्या, मारहाण, आणि शिवीगाळ करत भीतीचं वातावरण निर्माण केल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

पुणे: पोलीस भरतीसाठी मैदानी सराव करणाऱ्या तरुण-तरुणींवर आज सकाळी गावगुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील तळजाई टेकडीवर दररोज सकाळी सराव करणारी मुलं व मुली आज सकाळी नेहमीप्रमाणे रनिंग करत असताना १० ते १२ गावगुंडांनी अचानक तेथे जाऊन गोंधळ घालायला सुरुवात केली.

प्रत्यक्षदर्शींनुसार, या गुंडांनी आधी मुलींना उद्देशून अश्लील टिप्पणी केली, शिवीगाळ केली आणि नंतर काही मुलांना मारहाण करत "तुमची लायकी नाही पोलीस होण्याची" अशा अपमानास्पद शब्द बोलले.

तक्रारदार विद्यार्थ्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून ही टोळी सराव करणाऱ्या मुला-मुलींचा पाठलाग करत होती. अश्लील कमेंट, पाहून अश्लील चाळे, शिवीगाळ असे प्रकार सातत्याने घडत होते. मात्र आज त्यांनी थेट हात चालवत काही मुलांना मारहाण केली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं. या प्रकारानंतर संबंधित प्रशिक्षणार्थी, त्यांचे मार्गदर्शक आणि शिक्षक सहकारनगर पोलीस ठाण्यात पोहचले असून अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT