File Photo: Pune’s Lohgaon area where an 18-year-old student died by suicide following exam stress. saam tv
Video

CET मध्ये कमी गुण मिळाल्याने पुण्यातील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Student End Life Due To CET Exam Stress: पुण्यातील लोहगाव परिसरात CET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुर्वा दत्तात्रय खांदवे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वाने अलीकडेच एका खाजगी शिक्षण संस्थेच्या प्रवेश परीक्षेत (सीईटी) भाग घेतला होता. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या नैराश्यातूनच तिने शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दुर्वाचे वडील नोकरदार असून आई गृहिणी आहे. तिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT