Fire brigade teams at Laxmi Road in Pune working to control the blaze after an electric DP caught fire near Shivajirao Aadav parking area. Saam Tv
Video

पुण्यात अग्नितांडव; महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी|VIDEO

Pune Fire Scare: पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरात शिवाजीराव आढाव वाहनतळातील विद्युत डीपीला आग लागली आहे. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.

Omkar Sonawane

पुणे शहरातील लक्ष्मी रोड परिसरात आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. शिवाजीराव आढाव वाहनतळामध्ये असणाऱ्या विद्युत डीपीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंतर खबरदारी म्हणून लक्ष्मी रोडवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रविवार असल्याने आणि दिवाळीपूर्व खरेदीसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहनं वळवावी लागली. लक्ष्मी रोड हा पुण्यातील प्रमुख खरेदी केंद्र असल्याने या घटनेमुळे अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी नागरिकांना विनाकारण गर्दी करू नये आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

SCROLL FOR NEXT