Pune Traffic Update, Bhide Bridge Closure Saam
Video

Pune Traffic Update : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भिडे पूल पुढील ३ महिने बंद, कारण आले समोर

Bhide Bridge closure latest news Pune : डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पूलाच्या कामासाठी भिडे पूल ५ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग आणि वाहतूक व्यवस्थेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

पुण्यातील डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून ५ सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, नदीपात्रातील रस्ता मात्र वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या या पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नागरिकांनी वाहतुकीसाठी लकडी पूल (संभाजी पूल), बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज (Z-Bridge) या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.

का घेतला हा निर्णय?

डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वरच्या बाजूने बांधण्यात येत आहे. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून भिडे पूल ३ महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पादचारी पूल पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना मेट्रो स्टेशनवर ये-जा करणे अधिक सोपे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात २७ दिवसांपासून पुण्यात दूषित पाण्याचं संकट

Mumbai : मुंबई हादरली! व्यवसायिकाची झेरॉक्स दुकानात गळफास घेत आत्महत्या

Shirdi Temple: शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, कडक आणि बुरशी आलेल्या पेढ्यांची प्रसाद म्हणून विक्री

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, या १२ मंत्र्यांचा पत्ता कट?

डोळ्याचं पारणं फेडणारं सौंदर्य! मुंबईतील 'या' ठिकाणी गेल्यानंतर मन होतं प्रसन्न

SCROLL FOR NEXT