Pune Police intensify search as criminal Nilesh Ghaywal declared absconding by court. x
Video

Pune Crime: कोथरूड गोळीबार प्रकरण; पुण्यातील गुंड निलेश घायवळ फरार घोषित

Pune Gangster Nilesh Ghaywal: पुणे न्यायालयाने सिम कार्ड फसवणूक प्रकरणात कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळला फरार घोषित केले आहे. कोथरूड पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे आणि तपास तीव्र होत असताना मालमत्ता जप्तीची शक्यता आहे.

Akshay Badve

पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळला फरार घोषित करण्यात आले आहे. कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश निलेश घायवळला देण्यात आलेत. दरम्यान घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या व्यक्तीचे नाव वापरून सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल होता. या याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलेत.

निलेश घायवळ कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी आहे. निलेश घायवळचा साथीदार अजय सरोदेचा कारमाना समोर आला होता. बनावट कागदपत्रांद्वारे रहिवासी पुरावा, तसेच प्रतिज्ञापत्र सादर करून पुणे पोलिसांकडून शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविल्याचे तपासात उघडकीस आलं होतं. याप्रकरणी सरोदे याच्यासह शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दलालाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

आता या दलालाने आणखी १५ पिस्तूल परवाने मिळवून दिले असल्याची धक्कादायक बाबदेखील समोर आलीय. निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी १७ सप्टेंबर रोजी कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात एका तरुणावर गोळीबार केला होता. या प्रकरणात सरोदे याला अटक करण्यात आली होती. तपासात सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना असल्याचे उघडकीस आले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayesha Khan: 'धुरंधर' चित्रपटातील 'शरारत' गाण्यामुळे चर्चेत आलेली आयेशा खान कोण?

Warm Water Benefits: सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने 'हे' आजार होतात दूर

Maharashtra Live News Update: आयटी पार्क हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडी

Kolhapuri Chappal: महाराष्ट्रातल्या 'या' चप्पलेच्या जोडीची किंमत तब्बल 85000 रुपये; वाचा संपूर्ण माहिती

Amaal Mallik: 'कोर्ट जा...'; सचेत आणि परंपरा यांच्या आरोपांवर अमाल मलिकने दिली पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT