Pune BJP And Congress Clash Saam Tv
Video

Pune : पुण्यात मोठा राडा; भाजप कार्यकर्ता दगड फेकताना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Pune BJP And Congress Clash : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यामुळे पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले. दगडफेक आणि झटापटीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Alisha Khedekar

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

यावेळी भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा असल्याने भाजप कार्यकर्ते आतमध्ये शिरू शकले नाहीत. तसेच पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूकडील पदाधिकारी एकमेकांसमोर आले. यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

हा वाद इतका चिघळला की दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आमनेसामने येऊन एकमेकांवर दगड भिरकावले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या एका कॅमेऱ्यात भाजप कार्यकर्ता दगडफेक करताना कैद झाला आहे. झालेल्या दगडफेकीत एक-दोन काँग्रेस कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले. काँग्रेस नेते मोहन जोशी आणि प्रशांत जगताप यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अमरावतीत सोने व्यावसायिकावर दरोडा; ७ आरोपी अटकेत, १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त

Poha Cutlet Recipe : पोहे खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा कटलेट, सकाळी होईल पोटभर नाश्ता

भयंकर! उपायुक्तांच्या भावाची धारदार शस्त्राने हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Pithla And Bhakri Recipe: घरच्या घरी चविष्ट आणि चटपटीत पिठलं-भाकरी रेसिपी बनवा; वाचा आजीची खास रेसिपी

Silver Diamond Mangalsutra: नव्या नवरीसाठी खास सिल्वर डायमंड मंगळसूत्र, या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT