Pune Dagdusheth Ganpati grand naivedya celebration news saam tv
Video

Dagdusheth Ganpati VIDEO : बाकरवडी, मोदक, बेसनाचे लाडू अन् बरंच काही! दगडूशेठ बाप्पाला ४५१ पदार्थांचा नैवेद्य

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पाचरणी ४५१ प्रकारच्या अन्नपदार्थांचा महानैवेद्य आणि हजारो दिव्यांच्या लखलखाट करण्यात आला.

Akshay Badve

अक्षय बडवे

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात हजारो दिव्यांची मनमोहक आरास करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे. विशेष म्हणजे, यानिमित्ताने बाप्पाला तब्बल ४५१ विविध अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात गोड आणि तिखट अशा विविध पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये मिरचीपासून बेसनाच्या लाडूंपर्यंत, बाकरवडी आणि मोदकांसह शेकडो खाद्यपदार्थांचा समावेश आहे. दिव्यांच्या लखलखाटात आणि ४५१ पदार्थांच्या महाभोगामुळे मंदिराचे वातावरण भक्तिमय झाले आहे.

हा नेत्रदीपक दीपोत्सव आणि बाप्पाचा महाभोग पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने साकारलेला हा दैदिप्यमान सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भीमाशंकरची महादेव नगरी सजली

नकली केसांवरून चेष्टा केली थेट रॉड, दगड अन् दांडक्याने मारहाण; कल्याणमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी

Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत खा 'हा' पदार्थ; पोटाची वाढलेली चरबी कमी महिन्याभरात होईल कमी

Indian Traditions : मंगळसूत्रात काळे मणीच का असतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

UP Election 2027: १३०मधून फक्त २६ जागा,काँग्रेसच्या हातातून अमेठी-रायबरेलीही काढलं! युपीमध्ये सपाचा मोठा गेम प्लॅन

SCROLL FOR NEXT