Ajit Pawar  Saam tv
Video

ZP election Result : विजय पाहण्यासाठी अजितदादा हवे होते, उमेदवाराच्या डोळ्यात आले टचकन पाणी

Baramati ZP election latest results : बारामती जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. विजयानंतर ‘आजचा विजय पाहण्यासाठी अजितदादा हवेत’ असे म्हणत श्यामल वाबळे भावूक झाल्या असून त्यांनी हा विजय स्वर्गीय अजित पवारांना समर्पित केला.

Namdeo Kumbhar

Baramati ZP election result dedicated to Ajit Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. पुण्यातील बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पदरात मतदारराजाने मते टाकल्याचे दिसतेय. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होत आहेत. आजचा विजय पाहण्यासाठी दादा आपल्यात पाहिजे होते असे म्हणत विजयी उमेदवार श्यामल वाबळे यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आजचा विजय पाहण्यासाठी दादा आपल्यात पाहिजे होते, असे म्हणत श्यामल वाबळे यांच्या डोळ्यात पाणी आले. माझा विजय अजित दादांना समर्पित असल्याचे त्या म्हणाल्या.

बारामतीच्या वडगाव मोरगाव जिल्हा मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी संदीप कदम ( ढोले) विजयी झाल्या. बारामतीत आतापर्यंत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या दोन जागा जिंकल्या. शिरसुफळ पंचायत समिती गणातून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे विजयी... सुपे पंचायत समिती घनातून उज्वला पोपट खैरे या विजयी झाल्या आहेत . स्वर्गीय अजित पवार यांनी भाजप साठी सुपे पंचायत समिती गण आणि दोन जागा सोडल्या होत्या त्या दोन्ही जागेवर भाजप चे उमेदवार विजयी झाले आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs RCB: व्हिलन कोण? मुंबईने गमावला सलग तिसरा सामना; जाणून घ्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

Homemade Hair Oil: झपाट्याने वाढतील केस आणि गळतीही होईल बंद; दिशा पटानीच्या आईने सांगितलं खास 'सिक्रेट ऑईल'!

Maharashtra News Live Update: भोंदूबाबा खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Actress Trolled: आशा भोसले यांचं निधन, पण आदरांजली लता मंगेशकरांना; प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीकडून मोठी चूक

SCROLL FOR NEXT