Maharashtra ATS officials during raids in Pune’s Kondhwa area; one arrested in terror-related investigation. Saam Tv
Video

एटीएसची मोठी कारवाई; मुंबई आणि पुण्यात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट|VIDEO

Pune ATS Raids Connected: पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसने मोठी कारवाई करत दहा ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात जुबेर हंगरगीकर नावाच्या व्यक्तीस अटक करण्यात आली असून, कारवाईचा संबंध 2023 मधील आयसआयशी असल्याचं समोर आलं आहे.

Omkar Sonawane

पुणे: महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) आज पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत तब्बल दहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत जुबेर हंगरगीकर नावाच्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान पथकाच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे आणि डिजिटल उपकरणं लागली असून, त्यामध्ये काही व्हिडिओदेखील आढळले आहेत. या व्हिडिओंवरून आरोपीकडून देशातील विविध ठिकाणी जिहाद घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही कारवाई २०२३ मध्ये उघडकीस आलेल्या पुण्यातील ISIS-संबंधित प्रकरणाशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. त्या प्रकरणात मुंबई, पुणे आणि गुजरातमधील काही भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप होता. तपासात आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत जंगलात बॉम्ब चाचणी घेतल्याचं आणि कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. एटीएसच्या या छाप्यांमुळे दहशतवादी नेटवर्कबाबत महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

SCROLL FOR NEXT