महाराष्ट्रातील अनेक उद्योग इतर राज्यात पाठवले. यावरून देखील प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांची पहिली सभा आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मध्ये झाली. या वेळी प्रियांका गांधी यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
बाळासाहेब ठाकरे आणि यांचे विचार वेगळे आहेत. मात्र त्यांच्याविषयी कायमच मनात आदर असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. मागील दहा वर्षापासून राज्यात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.