PRAMOD MHASKAR RESIGNS saam tv
Video

राष्ट्रवादीला मोठा धक्का! दिग्गज नेत्याचा सुनील तटकरेंकडे राजीनामा; राजकारणात खळबळ

NCP Leader Pramod Mhaskar Steps Down as Pen Assembly Constituency: रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

Omkar Sonawane

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. म्हसकर यांनी राजीनामा देताना पत्रात कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रमोद म्हसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक महिन्यांपासून ते प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्हयात सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. त्यामुळे तयांच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान म्हसकर यांच्या राजीनाम्यामुळे रायगडमध्ये काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लाल की पांढरा तांदूळ, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहे उत्तम?

Maharashtra News Live Update: सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला

ऐन दिवाळीत 35 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Diwali Firecracker Colours: लाल, हिरवा आणि निळा, फटाक्यांमध्ये हे रंग येतात कुठून?

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

SCROLL FOR NEXT