Prabhadevi Pull SAAM TV
Video

Mumbai : मुंबईकरांनो लक्ष द्या! प्रभादेवी पूल आज रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद | VIDEO

Prabhadevi Bridge : प्रभादेवी पूल आज रात्री ११.५९ पासून वाहतुकीसाठी बंद राहणार. एमएमआरडीएकडून नव्या दोन मजली पुलाच्या उभारणीस सुरुवात होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रभादेवी परिसरातील पूल आज रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद होणार आहे. वरळी, शिवडी एलिव्हेटेड रोड प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. त्याबदल्यास दोन मजली नवा पूल उभारला जाणार आहे. या कामासाठी पुलावरील वाहतूक आज रात्री ११.५९ पासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पुल बंद झाल्यामुळे या परिसरात मोठे वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या नव्या पुलामुळे भविष्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagraj Manjule: ज्या समाजासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली, तोच समाज दुसरीकडे चाललाय; नागराज मंजुळे असे का म्हणाले?

ठाणे, पुण्यासह ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा GR जाहीर, वाचा यादी | VIDEO

Onion Price : कांद्याच्या दरात घसरण; ट्रॅक्टर प्रशासकीय कार्यालय आवारात नेत शेतकऱ्यांचे आंदोलन

Women Secrets: स्त्रिया मनातील या ५ गोष्टी कोणालाच सांगत नाहीत

Hair Care : केस गळती थांबवण्यासाठी करा या ७ पदार्थांचे सेवन

SCROLL FOR NEXT