Police and NSG commandos rescue children from RA Studio in Powai after YouTuber holds them hostage during a fake audition. Saam Tv
Video

पवईत YouTuber चा थरार, २० मुलांना ओलीस ठेवलं; पोलिसांनी बाथरूममधून घुसून वाचवलं|VIDEO

Mumbai Police And NSG Rescue: मुंबईतील पवई परिसरात एका यूट्यूबरने तब्बल २० शाळकरी मुलांना ओलीस ठेवून थरार माजवला. एनएसजी कमांडो आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मुंबई: राजधानी मुंबईतल्या पवई परिसरात एक थरारक घटना घडली आहे. पवईतील RA स्टुडिओत एका व्यक्तीने तब्बल 20 ते 22 शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. सर्व मुले 15 वर्षांखालील असून गेल्या काही दिवसांपासून या स्टुडिओत “शूटिंग ऑडिशन”च्या नावाखाली प्रशिक्षणासाठी येत होती. मात्र, आज अचानक आरोपीने सर्व मुलांना एका खोलीत बंद करून ओलीस ठेवले.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपीने स्वतःचा व्हिडिओ काढून मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस आणि NSG कमांडो घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीला अखेर ताब्यात घेण्यात आले. सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यांना पालकांकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक पालक आपल्या मुलांना विविध कोर्सेस व अॅक्टिव्हिटीत गुंतवून ठेवत आहेत. अशातच ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवण्यात आल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला सुरक्षा कवच देत या घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

पवार-ठाकरेंना हवी मनसे? काँग्रेसला राज ठाकरे नकोसे?

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेसेनेनं दिला धक्का

एकनाथ शिंदेंच्या सेनेचं काय होणार? शिंदेंच्या नाराजीची दखल कोण घेणार?

SCROLL FOR NEXT