Mumbai Police neutralized Rohit Arya in an encounter after he held 17 children hostage inside RA Studio, Powai. Saam Tv
Video

Rohit Arya Encounter: पवई ओलीसनाट्यातील आरोपीच्या छातीत गोळ्या, पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काऊंटर|VIDEO

Powai Audition Kidnapping Case Ends in Encounter: मुंबईतील पवई परिसरात १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. पोलिसांनी आर ए स्टुडिओतून सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली असून गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईतील पवई येथील 17 लहान मुलांना ओलिस ठेवलेल्या रोहीत आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. पोलिसांनी आर ए स्टुडिओच्या बाथरूममध्ये जाऊन 17 मुलांची सुटका केली.आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्या याने पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस गोळीबार करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या पवई भागात एका थरारक ओलीस नाट्याची अखेर झाली आहे, ज्यात रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने तब्बल १९ जणांना ओलीस धरले होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रत्युत्तरादाखल पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्य जखमी झाला असून, त्याच्याकडे एक एयरगन सापडली आहे.' या घटनेत १७ मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एका सामान्य नागरिकाचा समावेश होता. आरोपी वेब सिरीजच्या ऑडिशनच्या बहाण्याने मुलांना बोलावून त्यांना ओलीस धरून बसला होता. अखेरीस, पोलिसांनी इमारतीच्या बाथरूममधून आत प्रवेश करून धाडसी कारवाई केली आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली, मात्र या दरम्यान पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यात आरोपी जखमी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT