Rohit Arya held 17 students hostage in Powai after a fake audition; viral video shows students acting moments before the incident. Saam Tv
Video

ओलिस प्रकरणाआधी रोहित आर्यचा विद्यार्थ्यांसोबतचा ‘ऑडिशन’ व्हिडिओ व्हायरल

Rohit Arya viral Video Before Police Encounter: मुंबईतील पवई येथे बनावट ऑडिशनच्या नावाखाली १७ विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेआधी त्याने विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

मुंबई येथील पवईमध्ये रोहित आर्य नावाच्या इसमाने काल 17 मुलांना ऑडिशनच्या नावाने बोलावून डांबून ठेवल्याची घटना घडली होती. परभणी, लातूर तसेच राज्यातील विविध भागातून शूटिंगच्या नावाखाली हे विद्यार्थी त्याने बोलावले होते. आपल्या कामाचे सरकारने पैसे थकवल्याचा आरोप त्याच्याकडून करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत विद्यार्थ्यांची सुटका केली. मात्र या थरारक प्रसंगामध्ये पोलिसांनी रोहितचा एन्काऊंटर केला. दरम्यान आता या घटनेतील आरोपी रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी त्यांच्यासोबतचा एक ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये मुले अभिनय करताना दिसत आहेत. त्यानंतर आरोपीने या मुलांना ओलीस ठेवून प्रशासनाकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. या ऑडिशनचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

SCROLL FOR NEXT