नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अद्यापही महामार्गावर रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस असला तरी नाशिक जिल्ह्यात अद्यापही महामार्गावर खड्ड्यांची समस्या कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई नाशिक महामार्गाची पाहाणी केली होती. परंतु तरीसुद्धा रस्त्यांची अवस्था जैसे ते आहे. वाडीवऱ्हे, विल्होळी, घोटी परिसरात अनेक ठिकाणी अद्यापही मोठमोठे खड्डे असूनकाही ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम आज संपत असल्यानं सरकारकडून अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.