Congress leaders protest in Mumbai against the Election Commission, alleging voter fraud and constitutional violations. Saam Tv
Video

Mumbai News: निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल, मुंबईत रास्तारोको आंदोलन|VIDEO

Harshvardhan Sapkal Leads EC Protest: मुंबईत कॉँग्रेसने निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर बनावट मतदार तयार करण्याचा आरोप केला असून हा संविधानावर थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे.

Omkar Sonawane

  • राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर बनावट मतदार तयार करण्याचा गंभीर आरोप केला.

  • संविधानावर थेट हल्ला झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.

  • मुंबईत हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन झाले.

  • आंदोलनादरम्यान पोलिस आणि कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

कॉँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. ते म्हणाले, देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. आणि याबबत त्यांनी एक पीपीटी बॉम्बच टाकला. 2024 ची निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूकच नव्हे तर संविधानाच्या मूल्यावर थेट आघात आहे. देशभरात एक मोठा गुन्हा घडतोय.

भाजप आणि निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहेत. हा संविधानावर हल्ला असून याला गुन्हा समजले पाहिजे असा घणाघात राहुल गांधी यांनी केल्यानंतर आज कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मुंबई येथे निवडणुकआयोगाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान कॉँग्रेस नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी पोलीस आणि कॉँग्रेस कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगावर जोरदार ताशेरे ओढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT