Ramraje Naik-Nimbalkar seen sharing the stage with Chief Minister Eknath Shinde during a campaign rally in Phaltan, sparking major political speculation in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

Political Earthquake In Maharashtra: फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर हे थेट शिंदे सेनेच्या व्यासपीठावर दिसल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या खळबळजनक व्यक्तव्याने राज्यात 2 डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटला आहे. याचाच पहिला ट्रेलर आज फलटणमध्ये दिसला.

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर हे थेट शिंदे सेनेच्या व्यासपीठावर दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी त्यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक-निंबाळकर यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली असून त्याच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फलटणमध्ये दाखल झाले होते. या सभेत रामराजेंची उपस्थिती दिसताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

येणाऱ्या 2 डिसेंबरनंतर आता कोणता नवीन राजकीय सिनेमा महाराष्ट्राला पाहायला मिळतो. याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT