Guardian Ministerial Post SaamTv
Video

Nashik - Raigad News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती; काय आहे वाद? | VIDEO

Stay On Guardian Ministry Post Of Nashik And Raigad : महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा नाराजी सत्र सुरू झाल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे.

Saam Tv

राज्याच्या राजकारणात पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू असलेले महायुतीतले हे वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना हा अतिशय मोठा धक्का मानला जात आहे. कारण गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद दिल्याने दादा भुसे नाराज आहेत. तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद दिल्याने भरत गोगावले नाराज आहेत. भरत गोगावले यांना डावललं म्हणून महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्तारोको देखील केला. इतकंच नाही तर दादा भुसे आणि भरत गोगावले यांनी आपली नाराजी उघडपणे देखील बोलून दाखवली आहे.

एकीकडे रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. तर यापूर्वी दादा भुसे यांच्याकडे असलेलं नाशिकचं पालकमंत्रिपद आता गिरीश महाजन यांना दिल्याने भुसे नाराज झाले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेने दावा केला होता. भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रिपद हवं होतं. रायगडमध्ये शिंदे सेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी ३ आमदार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच आमदार असतानाही पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिलं गेलं आहे. त्यामुळे नाराज गोगावले समर्थकांकडून रास्तारोको देखील करण्यात आला आहे. आता महायुतीच्या वारिष्ठांकडून यावर नेमका काय तोडगा काढला जाणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT