लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा एनडीएचे उमेदवार आणि भाजप नेते ओम बिर्ला (Om Birla) यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचं तोंडभरून कौतुक केलंय. ओम बिर्ला यांचं अभिनंदन करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संसदेत म्हटलं आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते के. सुरेश (K. Suresh) यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदेच्या उमेदवारीसाठी ओम बिर्ला यांचं नाव सुनिश्चित केलं होतं. तर इंडिया आघाडीकडून (India Aghadi) b के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पाडली आणि ओम बिर्ला यांची अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा निवड करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.