NCP SHARAD PAWAR  Saam tv
Video

तुम्ही मार्गदर्शन करा, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकी काय झाली चर्चा?

Maharashtra Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

Namdeo Kumbhar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवारांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला. कोणतीही चिंता न करण्याची विनंतीही त्यांनी केली. शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

देशाला आपण खूप वर्षे मार्गदर्शन केले आहे आणि आजही करत आहात, असे पंतप्रधान मोदी पवारांना म्हणाले. मोदी म्हणाले की, आता सुप्रिया सुळे तयार झाली आहे, आम्ही सुप्रिया देश सांभाळू; तुम्ही आम्हाला फक्त ठणठणीत राहून मार्गदर्शन करत राहा. तुम्ही प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांच्या या फोनमुळे आणि आदरयुक्त संभाषणाने शरद पवार भारावून व भावनिक झाल्याचे दिसून आले. तसेच पंतप्रधानांनी तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल शरद पवारांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार

Kitchen Tips : फ्रिज नसतानाही भाज्या राहतील अनेक दिवस ताज्या; वापरा या सोप्या घरगुती ट्रिक्स

मंत्रालयात पुन्हा प्रशासकीय फेरबदल! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसाद शिंदेंची शालेय शिक्षण विभागात बदली

Salt Storage Vastu Tips: मीठ काचेच्या डब्यात ठेवावं की स्टीलच्या? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कोणता पर्याय आहे शुभ

Maharashtra News Live Update: ‘सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झालेल्या आम्हाला आवडेल’; फौजिया खान यांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT