PM Narendra Modi News SaamTv
Video

VIDEO : पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांचं कौतुक!

PM Narendra Modi : विरासत - ए - बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. त्यानंतर मोडीनि उपस्थिताना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांचं विशेष कौतुक केलं.

Saam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी बंजारा समाजाच्या काशीला, पोहरा देवीला भेट दिली आहे. पोहरा देवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विरासत - ए - बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण शनिवारी करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली. या वेळी त्यांनी सेवालाल महाराजांचा जयजयकार करत उपस्थित नागरिकांना अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी पोहरादेवी मंदिरात आरती केली. या दरम्यान त्यांच्या हस्ते बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत - ए - बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाले. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या संग्रहालयाची सुरुवात झाली होती. या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे विशेष कौतूक केले. सर्वांनी या संग्रहालयाला अवश्य भेट देण्याचं आवाहन देखील मोदींनी केलं. लाडकी बहिण योजना नारी शक्ती वाढवणारी योजना असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT