rahul gandhi and narendra modi  Saam tv
Video

नमस्कार केला, थांबून चर्चा केली; दिल्लीत राहुल गांधी आणि PM मोदींची गाठभेट, VIDEO

narendra modi and rahul gandhi meet : महात्मा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची अचानक गाठभेट झाली. या भेटीत दोघांमध्ये संवाद देखील झाला.

Vishal Gangurde

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त दिल्लीत संसदेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गाठभेट झाली. पंतप्रधान मोदी यांच्यासहित इतर नेत्यांनी या कार्यक्रमात संसदेतील प्रेरणास्थळ असलेल्या महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल देखील उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्याचे स्मरण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर दोघांनी बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला. दोघांच्या संवादाचा दुर्मिळ व्हिडिओ समोर आला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूला इतर नेते देखील उपस्थित होते. दोघांच्या भेटीच्या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT