लवकरच शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित हे नाटक असून याचे नाव 'मला काहीतरी सांगायचंय', असं आहे. 'मला काहीतरी सांगायचंय' हे एकपात्री नाटक असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित या नाटकात संग्राम समेळ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सेन्सॉर बोर्डाकडे हे नाटक आहे. दोन दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
राज्यात विधानसभा निवणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. यातच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित या नाटकात एकनाथ शिंदे यांचं पात्र शिवसेना फुटीबद्दल नेमकं काय सांगणार? यातून काही नवीन सत्य समोर येणार आहे का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.