Sindhudurga Saam TV
Video

Sindhudurg : कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान हाणामारी! | VIDEO

Kankavli Railway Station : कणकवली रेल्वे स्थानकात तिकीट रांगेतून वाद होऊन दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कणकवली रेल्वे स्थानकात तिकीट रांगेतून वाद होऊन दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. तुतारी एक्सप्रेस येण्याच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.घटनेची माहिती अशी की, तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली होती. त्यावेळी तिकीट खिडकीपाशी गर्दी वाढलेली होती.

याच दरम्यान एका तरुणाने रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावरून दुसऱ्या तरुणाने त्याला रोखलं आणि बाचाबाची सुरु झाली. काही क्षणांतच वादाने उग्र रूप घेतलं आणि दोघांमध्ये मारहाण झाली.या हाणामारीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. काही वेळासाठी स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

SCROLL FOR NEXT