Pankaja Munde Pankaja Munde
Video

Pankaja Munde : योगींच्या घोषणेला पंकजा मुंडेंचा विरोध, म्हणाल्या माझं राजकारण वेगळं!

Pankaja Munde on batenge to katenge : योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्याला पंकजा मुंडेंनी विरोध केलाय. याआधी अजित पवार यांनीही या नाऱ्याला विरोध केला होता.

Namdeo Kumbhar

Pankaja Munde : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा धुरळा उडत आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी दिलेली घोषणा राज्यभरात चर्चेत आहे. प्रचारसभावेळी योगी आदित्यनाथ यांनी 'बंटेंगे तो कटेंगे'अशी साद मतदारांना घातली होती. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले. महायुतीमध्ये यावरुन मदभेद दिसला होता.

अजित पवार यांच्या पक्षाकडून याची महाराष्ट्रात गरज नसल्याचं म्हटले होते. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही योगींच्या योजनेशी सहमत नसल्याचं म्हटलेय. माझं राजकारण वेगळं असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी मत व्यक्त केले. बंटेंगे तो कटेंगे'या नाऱ्याची महाराष्ट्रात गरज नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. फक्त भाजपमध्ये असल्यामुळे 'बंटेंगे तो कटेंगे' या नाऱ्याचे समर्थन करु शकत नाही. विकास हाच खरा मुद्दा असल्याचं मला वाटतेय. 'बंटेंगे तो कटेंगे' यासारखे विषय महाराष्ट्रात यायला नको. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा संदर्भ देत हे वक्तव्य केलेय. तेथील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

SCROLL FOR NEXT