Pandharpur News Today Vitthal Rukmini Temple News Saam TV News
Video

Vitthal Rukmini Temple News: 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार!

Pandharpur News Today: 15 मार्चपासून बंद ठेवण्यात आलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर 2 जून पासून पुन्हा सुरु होणार, लाखो भाविकांची प्रतीक्षा अखेर संपणार, विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची भाविकांना आस

Saam TV News

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता भाविकांना मूळ रूपात पाहता येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आलंय. येत्या दोन जूनपासून भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सातशे वर्षांपूर्वीचे जुने असून त्याकडे पुरातन ठेवा म्हणून पाहिले जाते. मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धन कामासाठी 15 मार्च पासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता दोन जून पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. दोन जून रोजी पहाटे चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठुरायाची नित्य पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे त्या अंतर्गत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिरातील बहुतांश काम हे आता पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील येत्या काही काळामध्ये पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT