Tragic scene at Chandrabhaga River in Pandharpur where two women devotees drowned; search for third woman ongoing Saam Tv
Video

Pandharpur News: पाण्याचा वेग ठरला जीवघेणा; चंद्रभागा नदीत बुडून २ महिला भविकांचा मृत्यू|VIDEO

Women Drowned In Chandrabhaga River: पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या जालना जिल्ह्यातील तीन महिला चंद्रभागा नदीपात्रात बुडाल्या. संगीता व सुनिता सपकाळ यांचा मृत्यू झाला असून एक महिला अद्याप बेपत्ता आहे.

Omkar Sonawane

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या जालना जिल्ह्यातील तीन महिला चंद्रभागेच्या पात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी समोर आली आहे. यामध्ये संगीता सपकाळ व सुनिता सपकाळ या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर एका महिलेचा अजूनही शोध सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने येथील भक्त पुंडलिक मंदिराजवळील खोल पाण्यात या महिला बुडाल्याची घटना घडली आहे. भोकरदन येथील काही महिला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या.

आज सकाळी त्या स्नानासाठी चंद्रभागा नदीपात्रात गेल्या असता, संगीता सपकाळ व सुनिता सपकाळ या दोन महिला पाण्यात बुडाल्या . त्यांना वाचवण्यासाठी आणखी एका महिलेने वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. असता तीही महिला बुडाल्याची माहिती आहे. दुर्दैवी घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या उजनी धरण 94 टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पंढरपुरातील चंद्रभागेचे नदीपात्र साध्या भरून वाहत आहे. चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. खोल पाण्यात महिला भाविक स्नानासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Maharashtra News Live Update: पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

SCROLL FOR NEXT