India Pakistan War saam tv
Video

India Pakistan War: पाकिस्तानचे AWACS विमान भारताकडून नष्ट, भारताचा करारा जबाब

AWACS Destroyed: भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात त्यांच्या हवाई संरक्षणाचा मुख्य आधार असलेले साब-२००० एरीये मॉडेलचे AWACS विमान पाडले, ज्यामुळे पाकिस्तानची हवाई नजर कमजोर झाली.

Dhanshri Shintre

भारताने पाकिस्तानचे AWACS हे विमानही पाडलेलं आहे. ८ मे रोजी संध्याकाळी पाकिस्तानने भारतातील विविध शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले. भारतानेही तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर दिले. या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलाने मोठे यश मिळवले. त्यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात तैनात असलेले अॅडव्हान्स्ड वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमान यशस्वीरित्या निष्क्रिय केले, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला.

AWACS विमान म्हणजे आकाशातील डोळा, जी एक अत्याधुनिक हवाई प्रणाली आहे. या विमानावर बसवलेली गोल रडार डिश ४०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील हालचालींचे बारकाईने निरीक्षण करते. ही प्रणाली शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे शोधून त्याची माहिती आपल्या हवाई दलाला देते आणि हवाई संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन प्रदान करते, ज्यामुळे सुरक्षेचा वेग वाढतो.

हे विमान पाकिस्तानचे हायटेक विमान आहे आणि या विमानाची माती भारताने केली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. ५२ ड्रोनही भारताने हाणून पाडलेलं आहे. हे एक विशेष प्रकारचे विमान असते ज्यावर गोल रडार लावले असते. यावर ३६० अंशांमध्ये फिरणारे रडार लावण्यात आलेलं आहे. या रडारच्या माध्यमातून शत्रूची विमानं किंवा शत्रूची कुठलीही कारवाई सुटत नाही. मात्र या रडारची सिस्टमही भारताने फेल ठरवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT