India counter-terrorism response saam tv
Video

India Pakistan Tension: पाकचा नवा डाव, या देशातून घुसघोरीचा प्रयत्न; भारत अलर्ट मोडवर|VIDEO

Pahalgam terror attack: पाकिस्तानने तिसऱ्या देशांच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्याचा नवा डाव आखला आहे, ज्यामुळे दक्षिण आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 26 भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हल्ल्याने एकीकडे देशवासीयांचे मन सुन्न झाले तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या प्रति सगळ्यांचेच रक्त खवळले आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच दहशतवादी जिथे असतील तेथे एकेकाला गाडून टाकू असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

तसेच हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताने पाकिस्तानच्या विरोधात कायदेशीर स्ट्राइक करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. यामध्ये पाकिस्तानकडून आयात केला जाणार सर्व मालावर बंदी घातली आहे. यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहे.

मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. आता पाकिस्तान आपला माल खपवण्यासाठी नवीन शक्कल लढवत असल्याचे कळत आहे. तिसऱ्या देशाद्वारे तब्बल 4 हजार कोटींचा माल पाकिस्तान हा भारताला पाठवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांना समजले आहे. मात्र, पाकिस्तानचा हा डाव देखील भारत हाणून पाडणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

SCROLL FOR NEXT