जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएची कारवाई सुरू झाली आहे. हुर्रियत नेत्यांच्या घरावर एनआयएने छापेमारी करत कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक ठिकाणी एनआयएने कारवाई केली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक एजन्सीला फ्री हँड देण्यात आले आहे. त्यानुसार एनआयएने देखील कारवाईला सुरूवात केली आहे. एनआयएकडून काश्मिरमधील अनेक हुर्रियत नेत्यांच्या निवासस्थानावर कारवाई सुरू आहे. पहलगाम परिसररासह जवळपास १०० हून अधिक ठिकाणी एनआयएकडून कारवाई सुरू आहे. एजन्सीच्या महत्वाच्या टीम देखील काश्मिरमध्ये दाखल झाल्या आहेत. दहशतवाद्यांची पाळंमुळं मुळासकट उपटून टाकण्यासाठी एनआयएने कंबर कसली आहे. या हल्ल्यासंदर्भात आणखी काही संशयास्पद गोष्टी मिळवत येतात का? काही धागेदोरे सापडतात का? या सर्व बाजूने एनआयए तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.