Shinde Sena Puts Up Banners Outside Matoshree  Saam Tv
Video

Operation Tiger: मातोश्रीबाहेर शिंदेसेनेची बॅनरबाजी, ६ खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरेंना डिवचलं; पाहा VIDEO

Shinde Sena Puts Up Banners Outside Matoshree: ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर शिंदेसेनेकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये बॅनरबाजी करुन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Priya More

ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्र्यातील कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी केली आहे. 'शिवसेनेचे वाघ हे खऱ्या शिवसेनेत दाखल' अशा आशयाचे बॅनर्स कलानगर परिसरात लावण्यात आले आहे. 'भगव्या विचारांची नवी ताकद, ६ खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांना साथ, ६ खासदारांची शिवसेनेला साथ' , असं देखील या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. या बॅनरबाजीच्या माध्यमातून शिंदेसेनेने ठाकरेसेनेला डिवचलं आहे. या बॅनरवर शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या ठाकरेंच्या बंडखोर ६ खासदारांचे फोटो लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीतून ठाकरेसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे. शिंदेसेनेच्या राजकीय शक्तीप्रदर्शनाची चर्चा होऊ लागली आहे. या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

SCROLL FOR NEXT