Masood Azhar saam tv
Video

Operation Sindoor: पाकड्यांवर कारवाई सुरुच! ऑपरेशन सिंदूरचा घातक वार; मसूद अझरच्या दोन मेहुण्यांसहित ५ ठार|VIDEO

India Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून मध्यरात्रीच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. या हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Omkar Sonawane

भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने 6 मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर लक्ष करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. आता हल्ल्याची नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत ठार झालेल्या पाच प्रमुख दहशतवाद्यांची नावे उघड झाली आहेत.

1. मदस्सर खास – लष्कर-ए-तोएबाशी संबंधित हा दहशतवादी पाकिस्तान सरकारच्या विशेष मान्यतेचा धनी होता. त्याच्या अंत्यविधीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, तसेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

2. हफिज जमील – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. तो मौलाना मसूद अझरचा मोठा मेहुणा होता.

3. मोहम्मद यूसुफ अझहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसीसाहब – जैश-ए-मोहम्मद संघटनेतील उच्चपदस्थ दहशतवादी. हाही मसूद अझरचा मेहुणा होता.

4. खालिद उर्फ अबू आकाशा – लष्कर-ए-तोएबाचा सदस्य. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तसेच अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत असे. त्याच्या अंत्यसंस्कारालाही पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

5. मोहम्मद हसन खान – जैश-ए-मोहम्मद संघटनेचा सदस्य. तो पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरीचा मुलगा होता. त्याचाही जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांशी थेट संबंध होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT