NAFED NCCF ₹5000 crore onion procurement scam details : नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत ५००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. याबाबत कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आर्थिक गुन्हे विभागाला (EOW) चौकशीचे आदेश दिले आहेत. विश्वास माधवराव मोरे यांनी कांदा खरेदीतील ५००० कोटींच्या घोटाळ्याची याचिका दाखल केली होती. कोर्टाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करून १६ जानेवारी २०२६ पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांकडून स्वस्तात कांदा घेऊन तो शेतकर्यांचा असल्याचे भासवून केंद्राची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.